कधी कधी वाटत
वेडा माणूस म्हणून जगन सोप असत.
उरत नाही भान मग
बेगडी जगाच.. बेगडी माणसाच
आणि त्याच्या बेगडी माणुसकीच...
उरत नाही पाश मग
बेगडी जातीच..बेगडी धर्माच
आणि त्याच्या स्वैर संस्काराच..
कधी कधी वाटत
वेडा माणूस म्हणून जगन सोप असत..
नसतो आपण कुणाचे..
जगतो आठवणीत जुन्या
मारलेला दगड कुरवाळत उराशी..
भळभळ जखमेची.. नव्याने
बांधतो आशेच्या चिंदयानी...
कधी कधी वाटत
वेडा माणूस म्हणून जगन सोपे असत
---आवलया
सुंदर भावनिक विश्लेषण
ReplyDelete