Friday, March 7, 2025

ती


मला वाटल होत तू बदलली असशील ......

आज हि तू तशीच आहेस .का.....
मला वाटल बदलली असशील 
नवीन जगाच्या स्वप्नांच्या रेट्यात ..
आणि थकलेल्या हप्त्यांच्या विंवचनेत ...
हो...वाढलेल्या महागाईच्या ...चर्चेत ...
खरच सांगतो ....
आजही तू तशीच आहेस ...
मला वाटल होत बदलली असशील 
जातीपातीच्या शंखनादाने ...
ओरबडून टाकलेल्या हुंकार्याने 
आणि निशब्द होणाऱ्या वाटमारीने..
पण आजही हि तू तशीच आहेस...
कसा नाही शिवला तुला जातीचा गंध ..
आणि धर्माचा रंग....
खरच आजही तुझ्या ....
खादि शबनम मध्ये ..
लेनिन, मार्क्स आणि आंबेडकर 
 गांधीजी सुध्दा आजही असतात का.....
कस लढायचं आणी कुणा बरोबर 
लढायचं हे तुला आजही सांगतात का.....
खरच सांगतो..
मला वाटल होत तू बदलली असशील ......

--------------------------------------------------------आवल्या 


No comments:

Post a Comment

नवी उमेद

धोका मिळाला वाटचालीत, जगण्याच्या प्रत्येक तहामध्ये, मी तडजोड पुन्हा करीत आहे.  शब्द होते गोड, आजही  गोडवा मनात माझ्या नव्याने साठवितआहे  सां...